फायदे :
तुमचा नेहमीचा कीबोर्ड व फॉन्ट वापरून हे रुपांतरण बऱ्याच फॉन्ट मध्ये करू शकता.सॉफ्टवेअर :
TBIL Data Converter हे तुमच्या संगणकामध्ये नसेल ते ते येथून डाऊनलोड करून घेऊ शकता.- TBIL Data Converter च्या मदतीने युनिकोड मधील फॉन्ट इतर कोणत्याही फॉन्ट मध्ये कनव्हर्ट करू शकतो. यासाठी प्रथम शीट युनिकोड (Mangal Font) मध्ये तयार करून घ्या.
- खात्री म्हणून सिलेक्ट ऑल करून फॉन्ट Mangal करून घ्या.
- TBIL Data Converter चालू करा. तुमची फाईल ज्या प्रकारची असेल तो प्रकार निवडा.
- Source Language मधून Marathi निवडा.
- Source Format / Font मधून Mangal निवडा. ( येथे तुम्ही ज्या फॉन्टमध्ये टायपिंग केले आहे तो फॉन्ट निवडा.)
- खाली दर्शवणाऱ्या त्रिकोणावर क्लिक करा. म्हणजे निवडलेला Mangal फॉन्ट खालच्या यादीत दिसेल.
- Target Language मधून Marathi निवडा.
- Target Format / Font मधून DVB TTSurekh निवडा. (येथे तुम्हाला ज्या फॉन्ट मध्ये रुपांतर हवे आहे तो फॉन्ट निवडा.)
- Next निवडा.
- Browse मधून तुमची फाईल लोकेशन निवडा.
- Sheet ची संख्या सिलेक्ट करा.
- Convert ला क्लिक करा.
- TBIL Data Converter असा मेसेज देईल. तुमची फाईल त्याच ठिकाणी फाईलचे नाव व अधिकचे _TBIL_Language_Font ह्या नावाने नावाने दिसेल. चेक करा.
तुमचा दिवस शुभ असो.
धन्यवाद..!
Tags
tbil