ही सुविधा तयार केल्याने वेगळी किंमत चुकुनही भरली जाणार नाही. यासाठी पुढील कृती करावी.
- सेल अथवा सेलरेंज सिलेक्ट करा.
- Data टॅब मधील Data Validation → Data Validation वर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स अवतरेल.
- Data Validation बॉक्समधील settings टॅब मध्ये पुढील प्रमाणे बदल करा.
Allow whole number
Data between
Minimum 0
Maximum 80 - आता Input Message टॅबमध्ये Title आणि Input Message लिहा.
- Error Alert टॅबमध्ये Title व Error Message लिहा. व OK करा.
- आता सेलमध्ये क्लिक केले की लगेच त्यामध्ये काय लिहायचे ते दिसेल. आणि सेल अथवा सेल रेंजमध्ये 0 ते 80 पेक्षा वेगळी किंमत लिहली जाणार नाही. जर लिहण्याचा प्रयत्न केला तर एरर मेसेज दिसेल. यामुळे युजरला आपण ठराविक संख्या लिहणे बंधनकारक करू शकतो.
धन्यवाद.. आपला दिन शुभ असो..!